Prakash Ambedkar, बुलढाणा : देशात लवकरच " वन नेशन वन इलेक्शन " च्या भूमिकेत केंद्र सरकार असून लवकरच देशात " वन नेशन वन इलेक्शन " लागू होणार असल्याच्या प्रश्नावर वंचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे... आंबेडकर म्हणाले की " देशातून राजेशाही कधींची संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे निवडून गेलेले हे राजे नाहीत तर प्रतिनिधी आहेत....आणि देशात नोकराला काढण्याचा अधिकार जनतेला आहे व नोकर निघत नसेल तर हिंसाचार करण्याचा अधिकारीही जनतेला कायद्याने असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे " . एकंदरीत वंचित आणि प्रकाश आंबेडकरांची वन नेशन वन इलेक्शन यावर विरोधाची भूमिका उमटली आहे.
एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवायचं आहे त्यांनी हा सगळा घोटाळा आणला आहे. one Nation, one election म्हणजे देशात नव्या पद्धतीने पाच वर्षासाठी हुकूमशाही आणण्याच काम सुरु आहे. देशात राजेशाही कधीच संपलेली आहे....निवडून गेलेले राजे नाहीत", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Amedkar) म्हणाले. ते बुलढाणा (Buldhana) येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर (Prakash Amedkar) म्हणाले, ज्यांच्या डोक्यात हुकूमशाही बसलेली आहे त्यांचं एक देश एक निवडणूक हे कारस्थान आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहून सहा नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत...उत्तरांची वाट बघत आहोत. evm विरोधात आम्ही आंदोलन सुरु केलंय. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे.... गावागावत रोष आहे. मारकडवाडी येथील गावकाऱ्यांचा बॅलेट पेपर वर मतदान घेण्याच्या निर्णयाला आडवण्याचा सरकार किंवा पोलिसांना अधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडवल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे.
वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाईल : प्रकाश आंबेडकर
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबविण्याचा आदेश का दिला ...? याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा. वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाईल. मी अनेकदा म्हटलं की आहे की EVM पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जातं होतं. आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरलं जातंय. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश Evm चा मुद्दा बघायलाच तयार नाहीत, अशी खंतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
20 डिसेंबर नंतर आम्ही EVM संदर्भात मोठी भूमिका घेऊ
संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में आहे...राज्यात आलेलं बहुमत हे EVM चं बहुमत आहे. 20 डिसेंबर नंतर आम्ही EVM संदर्भात मोठी भूमिका घेऊ..सध्या जेवढे पक्ष निवडून आले आहेत ते सर्व BJP वर लाईन मारत आहेत..... त्यामुळे निवडून आलेल्याचा फायदा नाही. काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवलं याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आम्ही BJP सोबत कधीही समझोता करणार नाही... हे आम्ही ठरवलं आहे, असंही आंबेडकर म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या