(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lockdown Update News Q&A : महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार का? वाहतुकीचं काय? जाणून घ्या तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं
Maharashtra Lockdown Guidelines Update News Q&A : राज्यात कोरोना वाढत चालला असताना लॉकडाऊनसंदर्भात, शाळांसंदर्भात तसेच यासह अन्य अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत. यासंदर्भात काही अफवा देखील पसरत आहेत. या माध्यमातून आम्ही आपल्याला पडणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केल. तसेच सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान राज्यात कोरोना वाढत चालला असताना लॉकडाऊनसंदर्भात, शाळांसंदर्भात तसेच यासह अन्य अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत. यासंदर्भात काही अफवा देखील पसरत आहेत. या माध्यमातून आम्ही आपल्याला पडणाऱ्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे का? - नाही. काही शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार काही ठराविक वेळांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.
राज्यात कुठे कुठे लॉकडाऊन आहे? - अमरावती, अकोला, यवतमाळ
पुण्यात लॉकडाऊन आहे का? - नाही
मुंबईत लॉकडाऊन आहे का? - नाही
Corona Update : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे कोणते निर्बंध लागू?
लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यात काय काय निर्बंध आहेत. - सिनेमागृह, व्यायाम शाळा ,जलतरण, तलाव ,मनोरंजन ,उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील. मालवाहतुकीवर निर्बंध नाही, उद्योग, अत्यावश्यक सेवा सुरु, मेडिकल सुरु
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे का? - नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु आहे. मुंबई लोकलमध्ये त्यांच्या नियमानुसार सर्वसामान्यांना ठराविक वेळेपुरती सेवा बंद आहे.
मुंबई, पुण्यात येण्या-जाण्याला बंदी आहे? - नाही.
राज्यात जिल्हाबंदी आहे का? - नाही.
विनामास्क फिराल तर दंड आहे का? - हो, विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मुंबई, पुण्यासह काही कारवायांमध्ये दंड देखील आकारला गेला आहे. पोलिसांनाही दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आले आहेत.
शाळा, महाविद्यालयं बंद आहेत का? - मुंबई उपनगरात शाळा, महाविद्यालयं बंदच होते. पुणे, नागपूर, अमरावती, वर्ध्यात सुरु असलेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यात अद्याप तरी सुरु आहेत. स्थानिक प्रशासन आणि कुलगुरुंनी महाविद्यालयांबाबत निर्णय घ्याव्यात असं सांगितलं गेलं आहे.
लॉकडाऊन टाळण्यासाठी आणि कोरोनाला रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी? - मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गर्दी टाळा