Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
कल्याणी नगर अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालची पोलीस चौकशी सुरू
कल्याणी नगर अपघात प्रकरण
अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालची पोलीस चौकशी सुरू
ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आज पुणे पोलिसांकडून शिवानी अगरवाला अटक
या मुद्द्यांवर होणार शिवानी अगरवालची चौकशी
- ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल बदलणे
- रक्ताचे नमुने बदलण्याच्या कटात सहभाग काय?
- पैशांची देवाण-घेवाण बद्दल आणि नेमकी किती रक्कम द्यायचं ठरलं, हे चौकशी होणार.
- रक्ताचे नेमके नमुने कुणाचे घेतले याची चौकशी करणे
- ड्रायव्हरला धमकावून डांबून ठेवणे
- गुन्ह्यातले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे
अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील धक्कादायक घटना
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे दहा ते पंधरा जणांच्या टोळीकडून एका तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.. तर किरकोळ वादातून तरुणाच्या हातापायाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे... दरम्यान या मारहाणीच्या घटनेतील आठ ते दहा जणांविरोधात लातूरच्या अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सद्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय....
























