Maharashtra Live Updates: किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर; जन्म-मृत्यू नोंद घोटाळाप्रकरणी गौप्यस्फोट करणार?
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं सोमवारी आयोजित उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्यात संकल्प विजयाचा, मुंबई जिंकण्याचा असा नारा दिला जाणार आहे. या मेळाव्याचं पोस्टर आज प्रसिद्ध करण्यात आलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं उपशाखाप्रमुखांच्या फळीत चैतन्य निर्माण करणं हे या मेळाव्याचं उद्दिष्ट आहे. हा मेळावा येत्या सोमवारी म्हणजे २७ ऑक्टोबर रोजी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार आहे. या मेळाव्यात मतदारयाद्यांच्या मुद्द्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या उपशाखाप्रमुखांना मार्गदर्शन करतील.
Kolhapur Rain: परतीच्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपलं,नागरिकांची तारांबळ
परतीच्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलं आहे... दिवसभर कडाक्याचं उन्ह पडल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पावसाने झोडपून काढलं आहे...त्यामुळे कोल्हापूर शहरात नागरिकांची तारांबळ उडाली आहे...सध्या शेतामध्ये भात कापणीची काम मोठ्या प्रमाणात सुरू आहेत... परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचा भात कापणीचा खोळंबा झाला आहे...
Crime News: कल्याण मोहने परिसरातील गावगुंडांवर पोलिसांची मोठी कारवाई; 7 गावगुंडांना अटक करत न्यायालयात केलं हजर
लहुजी नगर मधील ५ महिलांसह ३ जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले कल्याण न्यायालयाने ५ महिलेला न्यायालिय कोठडी सुनावली असून तिघांना पोलिस कोठडी सुनावली आहे
दोन्ही घाटातील आरोपींना २६ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी
कल्याण मोहने परिसरामध्ये झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी लहुजी नगर आणि मोहने गावातील गावगुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली असून आज या आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले
मोहने गावातील सात गावगुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी सहा जणांना पोलिस कस्टडी रिमांड, तर एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गावगुंडांनी लहुजी नगर मध्ये घुसून मारहाण केली होती पोलिसांनी या प्रकरणात लहुजी नगरमधील आठ जणांना आरोपी केले असून त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले
पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
























