Maharashtra Live Update: लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे राज्याचं पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.

Background
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या...
1. पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड, विशाल अगरवालचे वडील सुरेंद्रकुमार अगरवालचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती
2. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष, तर याआधी आरोपीला जामीनावर सोडल्यानं सर्व स्तरातून संताप
3. रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालला आज कोर्टात हजर करणार, विशाल अगरवाल अल्पवयीन आरोपीचे वडील, अगरवालला जामीन की कोठडी आज निर्णय
4. पुणे अपघात प्रकरणात राहुल गांधींची एन्ट्री, न्यायही पैशाने विकत घेतला जातोय असा हिंदुस्तान मोदी बनवतायत, राहुल गांधींचा हल्लाबोल
5. मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी नऊ दिवसांनी एसआयटीची स्थापना, गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांच्याकडून आदेश जारी तर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर
6. नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू, धरणावर फिरायला गेलेले पाच जण बुडाले, मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश
7. नाशिकच्या इगतपुरीतील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू, धरणावर फिरायला गेलेले पाच जण बुडाले, मृतांमध्ये दोन तरुण आणि तीन तरुणींचा समावेश
8. शिंदे गटात गेल्याने कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजाजन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
9. अहमदनगरमध्ये EVM ठेवलेल्या गोदामाजवळ अज्ञाताकडून छेडछाड, आमदार निलेश लंकेंकडून व्हिडीओ ट्वीट
Maharashtra Politics: गजानन किर्तीकर यांच्याविरोधात पक्षांतर्गत रोष : शिशिर शिंदे
Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मनातली खंत बोलून दाखवल्यानंतर त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत रोष व्यक्त होतोय. शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे कीर्तिकरांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास झालाय, असं गजानन कीर्तिकर म्हणाले
Maharashtra Monsoon Session: लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे राज्याचं पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता
Maharashtra Monsoon Session: पावसाळी अधिवेशन 16 जूनपर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार असून लोकसभा निवडणूक निकालामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याआधी 10 जूनपासून अधिवेशन घेण्याचं नियोजन होतं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजनात बदलाची शक्यता आहे.



















