Maharashtra Live Update: मान्सूनपूर्व पावसाचा फटका कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागाला! 25 ते 30 गावं अंधारात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अगरवाल
यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीय. विशाल अगरवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अगरवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अगरवाल हे नॉट रीचेबल झाले होते अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केलीये
खंडाळा घाटात बॅटरी हिलजवळ भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
Accident News : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून या अपघातात कार मध्ये बसलेल्या दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला आहे. लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला. सदर कार ही अलिबाग वरून तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते.
या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी, आणि भूमिका चौधरी, हे सहा जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Kokan News : मान्सूनपूर्व पावसाचा फटका कोकणातील दुर्गम आणि ग्रामीण भागाला! 25 ते 30 गावं अंधारात
Kokan News : कोकणात मागील चार ते पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे. दरम्यान, याचा परिणाम हा ग्रामीण भागात झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळली आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील पूर्व भागाताल जवळपास 25 ते 30 गावं मागील पाच ते सहा दिवसांपासून अंधारात आहेत. वीज नसल्यानं पाण्याअभावी देखील नागरिकांचे हाल होत आहेत. तर मोबाईल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. महावितरणकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. पण, दुर्गम आणि ग्रामीण भाग असल्यानं मर्यादा येत आहेत. दरम्यान, लवकरच विज पुरवठा सुरळीत केला जाईल असं महावितरणनं सांगितलं आहे.























