Maharashtra Live Update: बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर होणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Rain : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका, पपईची बाग उद्धव्स्त
Rain : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
पैठण तालुक्यातील सोमपुरी गावात शेतकऱ्यांची पपईची बाग अक्षरशः उध्वस्त झाली आहे.
वादळी वाऱ्यामुळे पपईचे झाड तुटून पडली आहे. त्यामुळे
झाडा लागलेल्या पपईचा शेतात सडा पाहायला मिळत आहे.
Akola : अकोल्याचील अकोट येथे कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकरी महिलांमध्ये हाणामारी
Akola : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर रांगेत असलेल्या शेतकरी महिलांमध्ये हाणामारी.
महिलांच्या हाणामारीचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती.
नगरपालिकेसमोर असलेल्या कृषी केंद्रावरील प्रकार.
कापसाचे अजित 155 बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकर्यांच्या मोठ्या रांगा.
ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे हाल.
Jalna : जालन्यात गॅस कटर च्या साहाय्याने ATM फोडलं, भर चौकात पहाटेची घटना
Jalna : जालन्यात गॅस कटर च्या साहाय्याने ATM फोडलं
भर चौकात पहाटेची घटना.
जालना शहरातील महावीर चौकामध्ये आज पहाटे चोरट्यांनी एसबीआय बँकेच ATM फोडून रोकड पळवल्याची घटना घडलीय.
आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला,
गॅस कटरच्या साह्याने अज्ञात चोरांनी ही ATM मशीन फोडून यातील रक्कम पळवल्याची माहिती आहे ,
ही घटना सकाळी 3 ते 4 च्या सुमारास घडल्याची माहिती असून पोलिसांकडुन या घटनेचा पंचनामा सुरू आहे,
दरम्यान नेमकी किती रक्कम चोरीला गेली हे बॅंक अधिकाऱ्यांच्या फिर्यादी नंतर समजणार आहे,
या प्रकरणी पोलिसांनी तीन पथके देखील आरोपीच्या शोधात रवाना केली आहेत
Jalgaon : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ, जळगावमधील सुवर्ण नगरीत दर विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले
Jalgaon : जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम
सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगावमधील सुवर्ण नगरीत जी एस टी सह सोन्याचे दर 76500 तर चांदी 96000 हजार रुपये विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले
सोने व्यावसायिकांनी दिलेल्या माहिती नुसार जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून चीन या देशाने आपली गुंतवणूक सोने आणि चांदीच्या मध्ये करण्यास सुरुवात केल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे दर वाढले आहेत
अजूनही मागणी मोठी असल्याने पुढील काळात ही सोन्याचे दर वाढण्याची शक्यता देखील सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे
Pune Accident : आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार. - पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार
Pune Accident : आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला. मात्र आम्ही याविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल करणार आहोत. - पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार-
* मुलाचे वडील आणि त्याला दारु देणार्या पब मारकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
* कल्याणी नगर, कोरेगाव पार्क भागातील पब आणि बारवर कारवाई करण्यासाठी एक्स्ईज डिपार्टसोबत काम करण्यात येईल.
* कोणालाही वाचवण्यात येणार नाही.
* विना नंबर प्लेट गाडी देणार्या डीलरवर देखील कारवाई करण्यात येईल.
* या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपविण्यात आलाय.
* या प्रकरणात पोलिस ठाण्यातील सी सी टी व्ही फुटेजचाही तपास करण्यात येईल. कोणी राजकीय दबाव आणला का हे यातुन समजेल.
* या प्रकरणात कोझी बार आणि ब्लॅक बार या दोन बार चालकांवर कारवाई करण्यात येईल.
* हा मुलगा खरच अल्पवयीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येतोय.
* हा मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता हे स्पष्ट आहे.