Maharashtra Live Blog Updates: ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार मातोश्रीवर
Maharashtra Breaking News: मुंबईसह राज्यभरातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE
Background
Maharashtra Breaking News: मुंबईसह राज्यभरातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्र आणि देशपातळीवरील राजकारणामध्ये काय घडत आहे? राज्यात मान्सूनची स्थिती काय, कोणत्या भागांमध्ये होणार पाऊस, सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेटस्.
मी पळणार नाही, तर लढणार व्यक्ती आहे : देवेंद्र फडणवीस
"देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील भाजपच्या बैठकीत बोलत होते.
मी पळणार नाही, तर लढणार व्यक्ती आहे : देवेंद्र फडणवीस
"देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही, लढणारा व्यक्ती आहे. चारी बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईतील भाजपच्या बैठकीत बोलत होते.
मोदींच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातून 1 हजार पदाधिकारी दिल्लीला जाणार
भाजपचा महाराष्ट्रातील 1 हजार पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण. भाजपचे सर्व आमदार, खासदार, लोकसभेचे संयोजक, प्रभारी, विधानसभा आणि लोकसभा विस्तारक यांना शपथविधीसाठी निमंत्रण. उदया संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार
Sangli News: सांगली शहरात मुसळधार पावसाने चिखल
गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह जिल्ह्यात सर्वदूर मंसूनपूर्व पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, या पाऊसाने महापालिका प्रशासनाच्या कारभाराचे पितळ उघडं पाडलं आहे. शहरात सर्वत्र पाऊसाने तळी साचली आहेत तर उपनगरांमध्ये चिखलाचे साम्राज्य झाले आहे. या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. शहरातील वॉर्ड क्रमांक आठ मधील गंगानगर मध्ये ड्रेनेजच्या कामामुळं रस्ता उकरून ठेवला होता. परिणामी पाऊसमुळे सर्व परिसर चिखलमय झाला. गेली 15 दिवस या बाबत अधिकाऱ्यांकडे रस्ता करा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, याकडे अधिकारी वर्गाने पूर्ण पणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून चिखलात बसून आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच महापालिकेचे अधिकारी त्याठिकाणी पोहोचले मात्र, या अधिकाऱ्यांना देखील नागरिकांनी चिखलात बसवले. नागरिकांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना देखील चिखलात बसावेच लागले. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले.
मोठी बातमी: एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातील महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्र्याचं नाव निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, यांच्या बैठकीत प्रफुल पटेल यांची मंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. सविस्तर वाचा