Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: हिंदीची सक्ती करून दाखवाच असं आव्हान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मीरारोडमधल्या सभेतून दिलं आहे. दुकानंच नाही तर शाळाही बंद करण्याचा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला. तसेच आज उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलखातीमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
नागपूर मध्ये पुष्पा स्टाईल गांजाच्या तस्करीचा प्रकार
नागपूर गांजा तस्करी
नागपूर मध्ये पुष्पा स्टाईल गांजाच्या तस्करीचा प्रकार पुढे आला आहे..
ट्रकच्या फ्लोवरच्या खाली स्वतंत्र कप्पे करून १०६ किलो २८ लाख किमतीचा गांजा उडीसा राज्यातून नागपूर मध्ये आणला जात होता.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर- हैदरबाद मार्गावर सापळा रचण्यात आला.
चालक ताजमोहमद शेख व क्लीनर रामलखन गुप्ता याला ताब्यात घेतले. सुरवाती आरोपी पोलिसांना सहकार्य करत नव्हते. पोलिसांनी कसून चौकशी केली असता गांजा तस्करीचा नवीन फंडा बघून पोलिस देखील चरकारवून गेले.
या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपीला अटक केली असून आरोपीचा आंतरजीय टोळीचा संबंध पुढे आल्याने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे
बाईट- संदीप बुवा, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा
प्रताप सरनाईकांचा मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे परिवारावर हल्लाबोल
धाराशिव:
प्रताप सरनाईक ऑन ठाकरे
......
ठाकरे परिवाराकडे मुंबईची पंचवीस वर्षापासून सत्ता, राज्यात अडीच वर्ष सत्ता असताना त्यांनी काही केलं नाही
मराठी परिवाराला मुंबईतून बाहेर करण्याचे कटकारस्थान त्यांच्याच अनुयायांनी केलं
प्रताप सरनाईकांचा मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे परिवारावर हल्लाबोल
हिंदी लादण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी मराठी जनावर केला, त्यामुळे त्यांचे टीका निरर्थक आहे
मी लिहिलेलं पत्र वस्तुस्थितीला धरून आहे, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी काय केलं हेच
मी पत्रात लिहिलं
प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेला लिहिलेल्या पत्रावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सरनाईकांचं प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे कौटुंबिक मुलाखत
सगळं काही ठरवून विचारलं जातं
काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे सगळं ठरलेलं असतं त्यामुळे त्यावर न बोललेलं बरं
आमचं महायुतीचं सरकार दगड असो धोंडे असो ते जनतेचे काम करत राहणार
उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीत निवडणूक आयोगाला शेंदूर फासलेला धोंड्या म्हटल्या बाबत प्रताप सरनाईकांना विचारलं असता मुलाखतीवर टीका
हरित धाराशिव उपक्रमासाठी धाराशिव येथे आले असता प्रताप सरनाईक यांचा संवाद























