Maharashtra Live Blog Updates: खारघरमधील अधिराज टॉवरमधील 55 व्या मजल्यावर लागली आग
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: सरकारला "दगाबाज रे..." म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत..अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का ?, सरकारने दिलेल्या पॅकेजचे काय झालं?, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम पोहोचली?, शेतकऱ्यांच्या हातात महिनाभरानंतर किती पैसे आले? याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
खारघरमधील अधिराज टॉवरमधील 55 व्या मजल्यावर लागली आग
Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37 येथे अर्ध्या तासापूर्वी आग लागली आहे. अधिराज टॉवरला आग लागल्याची प्राथमिक माहिती. तळोजा जेल जवळ संबंधित टॉवर असून 55 व्या मजल्याला आग लागली आहे.
वैचारीक मतभेद, पण मनभेद नाहीत; भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची समाज माध्यमांवरील पोस्ट चर्चेत
वैचारीक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत…
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची समाज माध्यमांवरील पोस्ट चर्चेत
मागील अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या नेत्यांची एकमेकावर टीकास्त्र सुरू आहे
हे टीकास्त्र सुरू असताना एका कार्यक्रमाला जाताना भाजप चे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे आजूबाजूच्या सीट वर, तर भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन हे मागच्या सीटवर
केशव उपाध्ये यांनी फोटो पोस्ट करत लिहिले आहे, वैचारीक मतभेद आहेत पण मनभेद नाहीत…
त्यामुळे एकमेकांवर टीका करणारे प्रवक्ते एकत्र प्रवासात काय गप्पा आणि चर्चा करणार हे विशेष























