Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तर महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने जीआर काढल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
नागपूरमधील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट
नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
जम्मूमध्ये पावसाचा कहर; मुसळधार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका
जम्मूमध्ये पावसाचा कहर..मुसळधार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका, अनेक ठिकाणी भूस्खलन..तर पंजाबमध्ये ३० वर्षांंतर महापूर.. १ हजारहून अधिक गावांना पुराचा फटका..























