Maharashtra Breaking LIVE News Updates: मुंबईत रात्रीपासून पाऊस सुरू, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE News Updates: देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE News Updates : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. रात्री मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असताना शेकडो मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आसरा घेतला. तिकीट घर ते अगदी फलाटा पर्यंत शेकडो मराठ्यांनी रात्री झोप घेतली.मुंबईच्या या महत्वाच्या स्थानकात रात्रभर एक मराठा लाख मराठा जयघोष गुंजत होता. इथे कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस ही तैनात होते.
विरार इमारत दुर्घटनेत खळबळजनक खुलासा; कसा चालतो भूमाफिया, प्रशासन आणि पालिकेचं सिडींकेट
विरार : विरारच्या रमाबाई अपार्टमेंट मधील भीषण दुर्घटनेत १७ जण दगावले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. मात्र रमाबाई अपार्टमेंट अवघ्या १० ते १२ वर्षातच कोसळली. किती निकृष्ट दर्जाच बांधकाम झालं यावरून स्पष्ट होतं. याच विजय नगर परिसरात अशा अनेक अनधिकृत इमारती बांधण्यात आता ही येत आहेत. बिल्डर आपल्या कडील काम करणाऱ्याच्या नाव पुढे करत, पालिका त्या अनधिकृत बांधकाम नोटीस देते, एमआरटीपी पोलीस ठाण्यात दाखल केलं जात. त्या बिल्डराच्या नाममात्र कामगारांवर गुन्हा दाखल होतो. बिल्डर ते जेल मध्ये गेल्यावर त्याचा पगार चालू ठेवतो. आणि येथे इमारती बांधून बिल्डर मोकळा होतो. रहिवाशी लोन ने घर घेतो. आणि त्यातच गाडला जातो अशी शोकांतिका आहे. काही बिल्डर बांधकाम अर्धवट होताच काहींना राहायला देतो , बाहेर दिखाव्यासाठी कपडे लटकवतो, कलर मारतो आणि पालिका त्यांना लगेच घरपट्टी लावली जाते, महावितरण लगेच लाईट ही देते, त्यामुळे मोठं सिडिंकेट या ठिकाणी चालते, या संपूर्ण सिडिंकेटची माहीती मनसेचे विभागप्रमुख दिनेश आहिरे यांनी दिली आहे.
सरकारच्या उपसमितीकडे बीड जिल्ह्यातील आमदारांची नवी मागणी; ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा
सरकारच्या उपसमितीकडे बीड जिल्ह्यातील आमदारांची नवी मागणी
ज्यांच्याकडे सातबारा आहे त्यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरा
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांकडे मांडला प्रस्ताव
आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, सुरेश धस यांनी केली मागणी
कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी आरक्षणाचा मिळतो लाभ
बीडच्या आमदारांनी केलेल्या मागणीवरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता






















