Maharashtra Live Updates: अमित शाहांची फडणवीसांसोबतची मुंबईतील बैठक बारगळली
Maharashtra Live Blog: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी , बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, जाणून घ्या एका क्लिकवर

Background
Maharashtra Live Blog: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आले आहेत. काल ते रायगड किल्ल्यावर गेले होते. त्यानंतर अमित शाह यांनी सुनील तटकरेंच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर रात्री उशीरा अमित शाह हे मुंबईत आले होते. ते मुंबईत आल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणास्तव ही बैठक होऊ शकलेली नाही.
बीड: टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल; टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रति किलो दर
टोमॅटोचे दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांनी एक एकर मध्ये दीड लाखांचा खर्च केला होता. मात्र ऐन तोडणी वेळी टोमॅटोचे दर कोसळल्याने ढास यांनी टोमॅटो बाजारात विक्रीसाठी देखील नेले नाहीत.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने टोमॅटोला गळती लागलीय. यातच टोमॅटोचे दर घसरले असून खत, बियाणे, मजुरी यासाठी केलेला खर्च देखील आता निघत नाहीये. दीड लाखांचा खर्च वगळून पीक काढण्यासाठी त्यांना 25 हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
बाईट:अशोक ढास - टोमॅटो उत्पादक शेतकरी
गृहमंत्री रायगडावर छत्रपती समोर नतमस्तक झाले म्हणून संजय राऊत यांना पोटदुःखी सुरू झाली: प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर
महाराजांचा काय सन्मान आत्तापर्यत उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी केला हे सर्वांना माहिती आहे. महाराजांचा वंशजाबाबत वाईट संजय राऊत बोलले होते. आता गृहमंत्री रायगडावर आले छत्रपती समोर नतमस्तक झाले म्हणून संजय राऊत यांना पोटदुःखी सुरू झाली आहे.
शिवाजी महाराज एकेरी उल्लेख
शब्दांचा खेळ करून विरोधकांना काही मिळणार नाही. कुठल्या तरी शब्दाचा किस पाडून वातावरण दूषित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत
ऑन छत्रपती निमंत्रण
कुणाला बोलवावं याबाबत महाराष्ट्र शासन, समन्वय समिती आणि राज्य सरकत यांचा तो निर्णय होता. त्यांना निमंत्रण गेलं असेल असं वाटतय. आम्हाला छत्रपती वारस गादी वारस यांचा आम्हाला आदर आहे
ऑन एकनाथ शिंदे अमित शाह भेट देवेंद्र फडणवीस नव्हते
देवेंद्र फडणवीस २ दिवस अमित शाह यांच्या सोबत होते. टाईमिंग वर्तुळ तुम्ही ठरवता. आता पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम असेल तर देवेंद्र फडणवीस जाणार ना?
ऑन निधी वाद
महायुती सरकार आहे दोन पेक्षा अधिक पक्ष आहे. मतभेद होत असतात त्यामुळे वरिष्ठांकडे विषय जात असतात. यात वेगळं काही नाही उगाच वाद करू नये
ऑन संजना घाडी
उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं कारण त्यांची नौका खाली झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे चाललेले आहेत
























