एक्स्प्लोर
सरकते जिने आता कायद्याच्या चौकटीत, विधेयक विधानसभेत मंजूर
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले.

नागपूर : महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने आणि सरकते मार्ग विधेयक 2017 आज विधानसभेने एकमताने मंजूर करण्यात आलं. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले. महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम 1939 मध्ये सरकते जिने आणि सरकत्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र उद्वाहन अधिनियम 1939 मध्ये आजपर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. सध्या उद्वाहन क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक प्रकारचे उद्वाहन सरकते जिने यांचा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी वापर होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकते जिने आणि सरकते मार्ग यांचे निरीक्षण करण्याची तरतूद करण्यात आली नव्हती, असं बावनकुळे यांनी हे विधेयक सादर करताना सांगितलं.
या विधेयकाची वैशिष्ट्ये काय?
- विधेयकाच्या नवीन मसुद्यात सरकते जिने आणि सरकते मार्ग यांचा प्रथमच समावेश करण्यात आला.
- सरकत्या जिन्यांचे आणि मार्गांच्या निरीक्षणामुळे वापर करताना अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- उद्वाहन वापर करताना अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत मिळावी म्हणून त्रयस्थपक्ष विमा संरक्षण बंधनकारक
- उद्वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याची तरतूद
- उभारणी आणि देखभाल करण्यासाठी ठेकेदार, कंपनी किंवा उत्पादकास लायसन्स देण्याची तरतूद
- असुरक्षितपणे वापर केल्यास अथवा नियमांचे उल्लंघन केल्यास सील करण्याचे अधिकार, अशा तरतुदी नवीन विधेयकात करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
