एक्स्प्लोर

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान, 24 तारखेला निकाल

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडलं असून 24 तारखेला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे.

विधानपरिषद निवडणूक - मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडलं असून 24 तारखेला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक,  लातूर-उस्मानाबाद- बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागांचा समावेश आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत दुपारी चार वाजेपर्यंत 99.57 टक्के मतदानाची नोंद झाली. 940 पैकी 938 जणांनी मतदान केलं. कर्जत आणि पनवेलमधील प्रत्येकी एका मतदाराची मतदानासाठी अनुपस्थिती होती. दोन्ही शेकापचे लोकप्रतिनिधी आहेत. नाशिकमध्ये 644 जणांनी मतदानाचा हक्क बजवल्यामुळे 100 टक्के मतदान झालं. उस्मानाबाद बीड लातूर मतदारसंघात 99.9 % मतदान झालं. एक हजार पाच मतदारापैकी एक हजार चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उस्मानाबाद (291) आणि लातूर (353) मध्ये शंभर टक्के मतदान झालं असून बीडमध्ये (360) एका मतदाराने आपला हक्क बजावला नाही. परभणी हिंगोलीतील 501 पैकी 499 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराची आकडेवारी 99.60 टक्के झाली आहे. अमरावतीत 489 पैकी 488 सदस्यांनी मतदान केलं. अमरावतीत मतदानाची आतापर्यंतची आकडेवारी 99.80 टक्के इतकी आहे. वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधील जागेसाठी 99.72 % मतदान झालं. 1059 मतदारांपैकी 1056 जणांनी मताधिकार बजावला. बीडमध्ये प्रतिष्ठेची लढत लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे  यांना पाठिंबा द्यावा लागला. नाशिक नाशिकमध्येही विधानपरिषद निवडणुकीत रंगत वाढली आहे. इथे  शिवसेनेचे नरेंद्र दराडे  विरुद्ध राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांच्यात सामना होत आहे. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतला वचपा काढण्यासाठी इथे भाजप थेट राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. कोकणात राणेंचा तटकरेंना पाठिंबा कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांना,  तर शिवसेनेने राजीव साबळे यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेला विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. अमरावती अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल मधोगरिया यांच्यात सरळ लढत होत आहे. त्याकडेही सर्वांचं लक्ष आहे. विधानपरिषद निवडणूक 2018 : कोणाविरुद्ध कोण? रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग   -  अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)  विरुद्ध राजीव साबळे  (शिवसेना) नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध  शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी) परभणी-हिंगोली -  विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस) उस्मानाबाद-लातूर-बीड - सुरेश धस (भाजप) विरुद्ध  अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा अमरावती -  प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध  अनिल मधोगरिया  (काँग्रेस) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)  विरुद्ध रामदास अंबटकर (भाजप) 21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख होती. 21 मे रोजी म्हणजेच आज मतदान , तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. या आमदारांचा कार्यकाळ संपणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक) राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली) काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड) भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती) भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) संबंधित बातम्या  कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे  रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस   पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!   विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा तिसरा उमेदवारही जाहीर  सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना' 

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget