एक्स्प्लोर

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून; विरोधक घेरण्याच्या तयारीत, सरकारची सत्वपरीक्षा

Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा

Maharashtra Vidhimandal Adhiveshan 2024 : मुंबईराज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Session LIVE) आजपासून पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. पूर्ण रणनीतिसह विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी पूर्णपणे तयारी केल्याचं बोललं जात आहे. 

आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतं आहे. 14 व्या विधानसभेचं हे शेवटचं अधिवेशन आहे. यंदा लोकसभेला विरोधकांना मिळालेली उभारी पाहता आजपासून सुरू होणारं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सरकारच्या वतीनं अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होईल, तर 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. 

राज्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. तर महायुतीला मोठा धक्का बसला. त्यामुळं यंदाचा अधिवेशनात विरोधकांचा वरचष्मा असण्याची शक्यता आहे. 

विरोधक कोणते मुद्दे मांडू शकतात?

  • मराठा विरुद्ध ओबीसी वाद 
  • पुण्यात सापडलेले अंमली पदार्थांचे अड्डे 
  • पॉर्शे अपघात प्रकरण 
  • घाटकोपर फ्लेक्स दुर्घटना 
  • कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव 
  • पावसाचा खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती 
  • राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था 

मराठा-ओबीसी वादावरुन सरकार कोंडीत? 

राज्यात सध्या मराठा ओबीसी वाद जोरात आहे. त्यातच मनोज जरांगे यानी मराठा आरक्षणात सगेसोयरेचा समावेश करण्याची केलेली मागणी, ओबीसींनी 54 लाख कुणबी नोंदीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची केलेली मागणी हे मुद्दे खासकरून सरकाराला मोठया प्रमाणात अडचणीत आणण्याची शक्यता आहे. याचाच पहिला टप्पा म्हणजे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बंदी घातल्याच पाहिला मिळालं. 

विरोधक आक्रमकपणे लढाई लढण्याची शक्यता पाहता सत्ताधारी देखील हल्ले परतवून लावण्याच्या तयारीत असल्याचं पाहिला मिळतं आहे. राज्यातील जनतेची साहनभुती आपल्या बाजूने वळण्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा सत्ताधारी पक्ष करण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणजे मध्य प्रदेश प्रमाणे सरकार राज्यात लाडली बेहना योजना घोषित करू शकतात 

मागील काही दिवसांपासून अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजप शिवसेनेकडून सुरू असल्याची राजकिय वर्तुळात चर्चा आहे. सरकारमधील हा बेबनाव झाकून अधिवेशनाला एकसंधपणे सामोरे जाण्याच आव्हान सत्ताधारी पक्षासमोर असणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Monsoon Session 2024: पुणे ड्रग्ज प्रकरणामुळे राज्य सरकार कोंडीत, ठाकरे गटाने आखला पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांना घेरण्याचा प्लॅन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP MajhaIndia Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA T20 World Cup Final : केशव महाराजची घातक ओव्हर, रोहित शर्मा अन् रिषभ पंतची  विकेट काढली, भारताला मोठे धक्के
केशव महाराजनं जाळं टाकलं, रोहित शर्मा-रिषभ पंत फसले, भारताला सुरुवातीला दोन धक्के
नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!
नशिबानं टीम इंडियाला कौल दिला, आता काम रोहितसेनेचं, पाहा नाणेफेकीचा भन्नाट योगायोग!
Embed widget