(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2021 | शनिवार | एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
स्मार्ट बुलेटिन | 13 नोव्हेंबर 2021 | शनिवार | एबीपी माझा
त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण, मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद, सध्या तणावपूर्ण शांतता
Maharashtra Tripura violence Update : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले. ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.
लवकरच कोरोनापूर्वीच्या वेळापत्रकानुसार रेल्वे धावणार, विशेष आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनसाठी आकारलं जाणार जादाचं तिकीट दरही रद्द, मात्र कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक
नवी दिल्ली: रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. कोरोना महासाथीच्या काळात नेहमीच्या एक्स्प्रेस/मेल ट्रेन स्पेशल ट्रेनच्या दरात (Covid special train) चालवण्यात येत होत्या. आता मात्र, रेल्वे वाहतूक पूर्वीप्रमाणे सामान्य वेळापत्रकानुसार (normal fare for trains) चालवण्यात येणार आहे. तिकिट दरही पूर्ववत करण्यात आले आहे. तब्बल २० महिन्यानंतर रेल्वे पूर्वीप्रमाणे धावणार असल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेचा हा निर्णय देशातून कोविडचे संकट कमी होत असल्याचं लक्षण असल्याचे म्हटले जात आहे. रेल्वे मंत्रालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार, येत्या काही दिवसांमध्ये हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये 1700 हून ट्रेन पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. मात्र, रेल्वे प्रवास करताना कोविड-19 चे निर्बंध आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू असणार आहेत. तिकिट दर कमी झाल्यामुळे आणि रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशी संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चा परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर धडकणार, पोलीस संरक्षणात खासगी बसची वाहतूक, तर संपावर राज ठाकरे आणि पवारांमध्ये खलबतं
क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीच्या एसआयटीनं नोंदवला आर्यन खानचा जबाब, रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सुरु होती चौकशी
कंगनाबेनचं डोकं का बधीर झालं हे NCBचे वानखेडेच शोधू शकतील! शिवसेनेचा सामनामधून टोला, भाजपवरही टीका
राज्यात शुक्रवारी 945 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 41 जणांचा मृत्यू
'लस' नाही तर 'बस' नाही; लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेचा निर्णय
मुंबई लसीकरणाचा आज महत्त्वाचा टप्पा गाठणार, आज पहिल्या डोसचं 100 टक्के लसीकरण पूर्ण होणार
निवडणुकांच्या तोंडावर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी खटाटोप, लाल किल्ला हिंसाचारातील 83 आरोपींना दोन-दोन लाखांची भरपाई
नीरज चोप्रा, मिताली राज, सुनिल छेत्री यांना 'खेलरत्न' पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते आज होणार सन्मान