Kolhapur News : कोल्हापूरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; अंनिसचे स्टिंग ऑपरेशन, डॉक्टरांची नावंही उघडकीस
Kolhapur News : अंनिस आणि पोलीसांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला तेव्हा गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा साठा सापडला, हा सर्व प्रकार पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
Kolhapur News : कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पन्हाळा तालुक्यातील पडळ येथे हे रॅकेट उघडकीस आल्याचे समजत आहे. कोल्हापूरातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केले आहे. नेमका प्रकार काय?
अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; अंनिसचे स्टिंग ऑपरेशन
कोल्हापूरातील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात अवैधरित्या गर्भपात होत असल्याची गुप्त माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीला मिळाली होती. त्यानंतर अंनिसने स्टिंग ऑपरेशन केले आणि हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जेव्हा अंनिस आणि पोलीसांच्या मदतीने या ठिकाणी छापा टाकला तेव्हा गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा मोठा साठा सापडला, हा सर्व प्रकार पाहून पोलीसही चक्रावले आहेत.
डॉक्टरांची नावही उघडकीस
या प्रकरणी गर्भलिंग निदान करणाऱ्या अनेक डॉक्टरांची नावही उघडकीस आली आहेत. उमेश पोवार, हर्षल नाईक सोबत आणखी काही आरोग्य कर्मचारी परवानगी नसतानाही गर्भपात करत असल्याची माहिती समोर आली.
पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणाची चौकशी करता महाराष्ट्र, गोव्याच्या विविध भागातून रुग्ण येत असून या ठिकाणी हजारो गर्भपात अवैधरित्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Kirit Somaiya : किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, माजी सैनिकांची रात्री उशीरा पोलीस ठाण्यात तक्रार
Shiv Sena MP Sanjay Raut : संजय राऊतांचं आज मुंबईत 'शक्तीप्रदर्शन'; ढोल-ताशा पथकांसह शिवसैनिक सज्ज
Mumbai Police : ऑर्केस्टा-डान्स बारमालकांचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, कधी गणवेशातच झोपतात तर नर्तक-गायकांचे फोटो काढतात