एक्स्प्लोर
अखेर महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची डीवायएसपीपदी नियुक्ती
मुंबई: अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आपलं आश्वासन पूर्ण केलं आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरीची डीवायएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जाहीर केलं होतं. हिवाळी अधिवेशनात डिसेंबर 2016 मध्ये विधानसभेत विजय चौधरींचं अभिनंदन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली होती.
12-12 किलोचे डंबेल्स, गळ्यात 20 किलोची साखळी, विजय चौधरीची मेहनत
विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र अनेक महिने उलटूनही विजय चौधरींना सरकारी नोकरी मिळत नव्हती. मंत्रालयाच्या चकरा मारूनही त्यांच्या पदरी अपयश येत होतं. त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. पण आता अखेर त्यांना नोकरी मिळाली आहे. 'महाराष्ट्र केसरी' विजय चौधरीबद्दल माहिती :- विजय चौधरी 2014 आणि 2015 साली सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरी किताबासाठी खेळण्याचा आणि तो जिंकण्याचाही अनुभव होता. यावेळीही त्या अनुभवाच्या आधारे खेळत सलग तिसऱ्यांदा विजयने 'महाराष्ट्र केसरी'चा किताब आपल्या नावावर केला.
- वय - 28 वर्षे
- उंची - 6 फूट 2 इंच
- वजन - 118 किलो
- धूमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र
- प्रशिक्षक - रोहित पटेल, ज्ञानेश्वर मांगडे आणि अमोल बुचडे
- मुख्य वैशिष्ट्यं - संयम, बचाव आणि प्रतिहल्ला ही खेळाची वैशिष्ट्यं
महाराष्ट्र केसरी विजय चौधरींना शासकीय सेवेत घेणार : मुख्यमंत्री
..तर फडणवीसांचं सरकार कधीच जाणार नाही: विजय चौधरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement