एक्स्प्लोर

Sikander Sheikh : पैलवान सिकंदर शेखबाबतचा वाद थांबणार? सांगलीच्या आंबाबाई तालीम संस्थेने शोधला मार्ग 

Maharashtra Kesari Controversy : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सिकंदर शेखबाबतचा वाद थांबण्यासाठी सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी मार्ग शोधलाय.

Maharashtra Kesari Controversy : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर (Sikander Sheikh) अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे बोलून दाखवले आहे. सेमी फायनलच्या लढतीत चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला गुण दिल्याचा आरोप होत आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. परंतु, आता हा वाद थांबवण्यावर सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेने मार्ग शोधून काढलाय. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय या संस्थेने घेतलाय. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. या लढतीत महेंद्रचा मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नतसाना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सोशल मीडियावरून होत आहेत. हा फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला नाही तर तो आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी पंच मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी केलाय. यावरून कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल झालाय. परंतु, सांगलीच्या अंबाबाई तालीम संस्थेने हा वाद मिटवण्यासाठीचा मार्ग शोधून काढलाय.   

काय आहे मार्ग? 

या वादाला तिलांजली देण्याची भूमिका सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी  घेतलीय. त्यासाठी त्यांनी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये मातीतील निकाली कुस्त्यांचे खास मैदान अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात लवकरच घेण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये झालेल्या कुस्ती मधील विजेत्याला महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची चांदीची गदा देऊन आणि महाराष्ट्र महाकेसरीचा 'खिताब  देऊन गौरविण्यात येणार आहे. 

या मैदानात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी येऊन लढावं आणि सध्या सुरू असलेला वाद थांबवावा अशी भूमिका शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी  घेतली आहे. संजय भोकरे यांच्या या निर्णयाला पैलवान सिकंतर शेख याने प्रतिसाद देत या मैदानात येऊन लढण्याची तयारी देखील दर्शवली आहे. आता महेंद्र गायकवाडने देखील या मैदानात येऊन लढावे आणि हा कुस्ती मधील वाद थांबवावा असे आवाहन संजय भोकरे यांनी केले आहे. 

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Kesari 2023 : पोलिस शिपायाकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी? सिकंदर शेखविरोधात चार गुण दिल्याचा आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget