हर्षवर्धन पालांडेंवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, आर्थिक देवाण-घेवाणीतून हल्ला केल्याचा आरोपींचा जबाब
पालांडे यांच्याकडून सोनावणे यांना 50 हजार रुपये येणं होतं. वारंवार मागणी करूनही पालांडे ती रक्कम देत नसल्यामुळं पालांडेंना मारहाण केल्याचा जबाब आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
![हर्षवर्धन पालांडेंवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, आर्थिक देवाण-घेवाणीतून हल्ला केल्याचा आरोपींचा जबाब Maharashtra Kalyan news the two who attacked Harshvardhan Palande were arrested the accused responded that they attacked through financial exchange हर्षवर्धन पालांडेंवर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक, आर्थिक देवाण-घेवाणीतून हल्ला केल्याचा आरोपींचा जबाब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/20/d98b999fc4f6f3dc31e20a1afdf86ca51658339835_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कल्याण : कल्याण शिवसेना उप शहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावरच्या हल्ल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. गौतम सोनावणे आणि अंबादास कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पालांडे यांच्याकडून सोनावणे यांना 50 हजार रुपये येणं होतं. वारंवार मागणी करूनही पालांडे ती रक्कम देत नसल्यामुळं पालांडेंना मारहाण केल्याचा जबाब आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असून, पालांडे यांनी मात्र त्यांच्यावरच्या आरोपांचा इन्कार केला आहे.
कल्याण पूर्वेतील शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास हल्ला झाला होता. हा हल्ला माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यानी केल्याचा आरोप पालांडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे समर्थक असल्याने या प्रकरणाला वेगळच वळण लागलं. तर दुसरीकडे महेश गायकवाड यांनी देखील आरोपांचा खंडन करत घडलेली घटना दुर्दैवी आहे. माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही ,पोलिसांनी सखोल तपास करत कारवाई करावी असे स्पष्ट केलं होतं. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी तपास करत हल्लेखोर गौतम सोनवणे व अंबादास कांबळे या दोघांना अटक केली आहे,मात्र हल्लेखोरांनी उसने घेतलेले पैसे परत करत नसल्याने मारहाण केल्याचं जबाबात सांगितले.
याबाबत पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. तर याबाबत जखमी असलेले हर्षवर्धन पालांडे यांनी मात्र या सर्व आरोपांचा खंडन केलय पालांडे यांनी पोलिस आरोपींना पाठीशी घालत असून पोलिस कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा सवाल केला. पुढे बोलताना माझा लोकशाहीवर विश्वास आहे मला नक्कीच न्याय मिळेल आणि नाही मिळाला तर लोकशाही मार्गाने न्याय मिळवेन ,पैसे परत करत नसल्याने मारहाण झाल्याचा आरोप खोटा आहे. आरोपींना पाठीशी घालण्याच काम पोलिस करत आहेत. पक्ष प्रमुख किंवा नेते येण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्या परिस्थीत सद्या पक्ष बांधणी किंवा इतर महत्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यामुळे मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं सांगितलं.
तर याच दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांना घडलेला प्रकार सांगितला ,पोलिसांनी तक्रार घेतली मात्र पाहिजे तशी कलमं लावली नाहीत हे खासदार शिंदे यांना सांगितलं आहे. खासदारांनी डीसीपीशी बोलतो असे आश्वासन दिलं असल्याचे पालांडे यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)