एक्स्प्लोर

Maharashtra Income Tax Raids : अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर आयकरच्या धाडी, उदयनराजे म्हणतात...

सध्या धाडी इकडे पडतात, धाडी तिकडे पडतात, पण लोकांनी यातून बोध काय घ्यायचा हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला प्रश्न पडला असल्याचं उदयनराजे म्हणाले.

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर भाजप नेते खा उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘मला यावर काहीही वाटत नाही मी सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे लोकांची जशी मानसिकता बधिर झाली आहे, तशीच अवस्था माझीही आहे. या धाडींबद्दल मला काही माहिती नाही. सध्या धाडी इकडे पडतात, धाडी तिकडे पडतात, पण लोकांनी यातून बोध काय घ्यायचा हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी  म्हणून प्रश्न पडला आहे. आता काय प्रत्येक ठिकाणी ही एक फॅशन झालीय’, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

तसेच माध्यमं लोकांपर्यंत काय पोहोचवतात यावर लोकं विचार करतात. क्रिकेटमध्ये जसं क्लीन बोल्ड असतं तस आता ही एक फॅशन झाली आहे. Give him Clean cheat, Give him Clean cheat  यावर लोकं विचार करतात की क्लीनचिट म्हणजे नेमकं काय? हा नेमका शब्द तडजोडी करता आहे का असे लोकं विचार करतात. लोकप्रतिनिधींचा प्रभाव काही कार्यकर्त्यांवर होत असतो. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे. आत्ताचं  सगळं चित्र पाहिल्यानंतर विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो. एकदा का विश्वासाहर्ता गेली की पक्ष कोणताही असो विश्वासार्हता गमवली की काही राहतं नाही’ असं उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान अजित पवारांच्या नातेवाईक आणि कुटुंबियांवर सुरु असलेल्या छापेमारीविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी समर्थकांनी पुण्यात आंदोलन करत अजित पवारांना समर्थन दिलं. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांची भेट घेत त्य़ांना शांततेचं आवाहन केलं. शिवाय त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद मानले.

अजितदादांकडे सरकारी पाहुणे आलेले, पाहुण्यांची आपल्याला चिंता नाही : शरद पवार

पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज सोलापुरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना केलं. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागानं धाडी दिल्या. याबाबत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं.

संबंधीत बातम्या

आयकर विभागाच्या धाडीत धक्कादायक माहिती उघड! हजार कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार

Maharashtra Income Tax Raids : कारखान्यांवर झालेल्या धाडसत्रांबाबत शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया..  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 
Embed widget