एक्स्प्लोर
बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

Maharastra HSC Class 12 Results
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. आज (30 मे) रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.
सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
Advertisement
Advertisement
























