Loudspeaker Controversy : राज ठाकरेंवर गुन्हा का दाखल झाला? गृहराज्यंत्री शंभूराज देसाईंनी सांगितले कारण
Raj Thackeray : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा का दाखल झाला याबाबत माहिती दिली आहे.
Loudspeaker Controversy : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्यावर ओरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर देखील गुन्हा दाखल आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजीच्या सभेला परवानगी देताना काही अटी शर्तींवर परवानगी देण्यात आली होती. या शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती गृहराज्यंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांची 1 मे रोजी ओरंगाबाद येथे सभा झाली. या सभेसाठी राज ठाकरे यांना काही अट शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. पोलिसांच्या अटी शर्तींचे पालन राज ठाकरे यांनी केले का? हे औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी तपासले आहे. शिवाय सभेदरम्यान या अटीशर्तींचे पालन होते का हे औरंगाबाद पोलीस पाहात होते. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे व्हिडीओ पाहिले आहेत. त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या अटींचे पालन झाले नसेल त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे. येथील सामान्य माणसांना त्रास होईस असे कोणीच वागू नये. कोणीही कायदा हातात घेण्याचं काम केलं तर त्यांच्यावर कारवाई होणार. कायद्याला आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्या. कायदा सर्वांना सारखा आहे. त्याचं कोणीही उल्लंघन करू नये. राज्यभरातील पोलीस सतर्क आहेत. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होणार. जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्मान होईल असे काम कोणीही करू नये."
मनसैनिकांना गृहराज्यमंचे आवाहन
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनसेला शांततेचं आवाहन करत कायदा हातात न घेऊ नये असं म्हटलं आहे. अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी मनसेच्या सभेला परवानगी दिली होती. या सभेदरम्यान अटी-शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरुन कारवाई केली असेल. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस सज्ज आहेत. मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायद्याला कायद्याने काम करु द्या, पोलिसांना त्यांचं काम करु द्या. कारवाई योग्य वाटत नसेल तर न्यायालय आहे, तिथे न्याय मागा. पण रस्त्यावर उतरुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नये, असं शंभूराज देसाई म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल, अटक होणार?