असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द कशासाठी? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील पाच महत्त्वाचे मुद्दे
Governor Bhagat Singh Koshyari letter : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
Governor Bhagat Singh Koshyari letter to CM Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्यावरून हा संघर्ष आणखी चिघळणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्या पत्राला उत्तर दिले आहे. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला होता. हा प्रस्तावाला मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता.
राज्यपालांच्या पत्रातील 5 मोठे मुद्दे
1. मी संविधानाच्या कलम १५९ अन्वये संविधानाचे रक्षण, संरक्षण आणि रक्षण करण्याची शपथ घेतली आहे.
2. सुधारित नियमांनुसार ही निवडणूक घेण्यास संमती देणं या टप्प्यावर घटनाबाह्य आणि बेकायदेशीर वाटतं आणि त्यामुळे प्रथमदर्शी परवानगी दिली जाऊ शकत नाही.
3. महाराष्ट्र विधानसभा नियम 6 आणि 7 मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे, या दूरगामी सुधारणांचे परिणाम कायदेशीररित्या तपासले जाणे आवश्यक आहे.
4. मी सभागृहाच्या कार्यपद्धती/कार्यवाहीच्या बाबतीत त्याच्या विशेषाधिकारावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही; तथापि, प्रथमदर्शनी दिसणार्या प्रक्रियेस संमती देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही.
5. पत्रातील स्वर राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि अवमान करणारा ; तुमच्या पत्राचा असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी वैयक्तिकरित्या दुःखी आणि निराश झालो
मुख्यमंत्र्यांनी पत्रात काय म्हटलं होतं?
कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्रातून उत्तर दिलं होतं. 'विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही? हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये, आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत सरकार निवडणूक घेण्याबाबत आग्रही भूमिका मांडली पत्रातून मांडली होती.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठणकावत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सरकार आग्रही असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली आहे. विधिमंडळ कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणीदेखील या पत्रातून केली आहे
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- ही कोणती भाषा? मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल खवळले
- Thackeray vs Koshyari : मुख्यमंत्र्यांचं हेच 'ते' पत्र; ज्यामुळे राज्यपाल भडकले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha