एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation : फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री? आज संध्याकाळी सात वाजता होणार शपथविधी, सूत्रांची माहिती

आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शपथ घेणार आहेत. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. Government Formation

Maharashtra Government Formation : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज रात्री सात वाजता शपथ घेणार आहेत.

एकनाथ शिंदे  हे देखील गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे प्रथम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी सात वाजता शपथ घेणार आहेत.

फडणवीस आणि शिंदे आज करणार सत्ता स्थापनेचा दावा

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आत्ताच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे हे थेट गोव्याहून फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे. आजच भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं आज रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबच शिक्कामोर्तब झाला आहे. आज राजभवनावर जाऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार बनवण्याचा दावा करतील. दरम्यान या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

10 दिवसानंतर राजकीय नाट्यावर पडदा

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. 

शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे  यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात गेले दहा 10 दिवस राजकीय नाट्य पाहायला मिळाल. राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र सूरत ते गोवा व्हाया गुवाहाटी असं सरकत गेलं. आणि उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानं या राजकीय नाट्यावर पडदा पडला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget