एक्स्प्लोर
पहिली ते सातवीसाठी सर्व विषयांचं एकच पुस्तक, दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नवा प्रयोग
विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी राज्य सरकार नवा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्याचा सरकारचा विचार आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मुंबई : आता शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी नवा प्रयोग शिक्षण विभाग हाती घेत आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दर तीन महिन्याने सेमिस्टरमध्ये 3 ते 4 पुस्तक एकत्र करुन एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे.
पहिले ते पाचवी विद्यार्थ्यांना वर्षातून तीन महिन्याला 1 पुस्तक अशी तीन पुस्तकं असतील. यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकत्र केला जाणार आहे. तर सहावी आणि सातवीसाठी वर्षभरात चार पुस्तकामध्ये या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे. त्यामुळे वर्षात 3 ते 4 पुस्तकं दर तीन महिन्यात बदलावी जरी लागत असली तरी वर्गात मात्र शिकण्यासाठी एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरुन शिक्षण विभागाला वारंवार फटकारले आहे. सध्या शाळेचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी रोज तीन ते चार पुस्तक, वह्या दप्तरात घेऊन जातात. आता मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर विद्यार्थ्यांना दप्तरात एकच पुस्तक न्यावं लागणार आहे. सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबच एकत्रित पुस्तके तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. द्विभाषिक पुस्तके एकत्रित पुस्तकांप्रमाणेच पुस्तके द्विभाषिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. भाषेव्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकात संकल्पना इंग्रजीतूनही देण्यात येणार आहेत. सेमी इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके असावीत या मागणीला जोडून द्विभाषिक पुस्तकांची कल्पना विभागाच्या विचाराधीन होती. येत्या शैक्षणिक वर्षांत प्रायोगिक तत्त्वावर अशी पुस्तके तयार करण्यात येणार आहेत. गणित आणि विज्ञान या विषयाचे मराठी माध्यमातून अध्ययन होत असताना जर विद्यार्थ्यांना गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ जर इंग्रजीतून कळले आणि त्याविषयी शिक्षकांनी अध्यापन करताना थोडे स्पष्टीकरण केले तर विद्यार्थ्यांचे अध्ययन सहज सोपे होईल, असा विचारप्रवाह निर्माण झाला आणि त्यातूनच गणित आणि विज्ञान या प्राथमिक स्तरावरील मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचे द्विभाषिकरण करावे, असा निर्णय शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement