Coronavirus Updates: कोरोनानं पुन्हा धाकधूक वाढवली; गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढली, हिवाळा जबाबदार?
Coronavirus Updates: आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाची धाकधूक वाढवली आहे. राज्यात काल कोरोनाचे 3 रुग्ण आढळले, देशात 122 रुग्णांची नोंद
![Coronavirus Updates: कोरोनानं पुन्हा धाकधूक वाढवली; गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढली, हिवाळा जबाबदार? Maharashtra Coronavirus Updates From last week Corona patient numbers Increase India Covid 19 Know All Details Coronavirus Updates: कोरोनानं पुन्हा धाकधूक वाढवली; गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढली, हिवाळा जबाबदार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/10/f92d8319fe5309f1d2227f016d1674d81702201556444878_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Coronavirus Updates: कोरोना व्हायरसनं (Covid-19 Updates) संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं (Corona) पाठ फिरवली आणि पुन्हा जगभरातील व्यवहार सुरळीत झाले आहेत. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाची धाकधूक वाढवली आहे. हिवाळा (Winter 2023) सुरू झाला असून हळूहळू वातावरणातील गारवा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता कोरोनानंही (Maharashtra Covid Updates) डोकं वर काढलं आहे.
मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली होती. राज्यात एकही कोरोना रुग्ण आढळत नव्हता. मात्र हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. राज्यात काल तीन रुग्ण आढळले. तर देशात 122 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान गेल्या वर्षीही हिवाळा सुरु होताच अचानक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यंदा देखील डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सावध राहण्याचा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.
हिवाळ्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ?
राज्यात आणि देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या अगदी शून्यावर आल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वातावरणातील उष्णता कमी होऊन वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. उष्णतेपासून सर्वांचीच सुटका झाली असून अल्हाददायी वातावरणामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, आता कोरोनानं पुन्हा एकदा टेन्शन वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात गारवा वाढल्यामुळेच पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झालीये का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
काळजी घ्या, कोरोना अजून गेलेला नाही
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, काल दिवसभरात तीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशभरात काल 122 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. कोरोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ यासाठी वातावरणात वाढलेला गारवा जबाबदार तर नाही ना? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान, कोरोनाची आकडेवारी तशी घाबरवणारी नसली तरी, काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, कोरोनाच्या नियमांचंही पालन करणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं यांसारख्या नियमांचा वापर करणं प्रत्येकासाठी फायद्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)