Maharashtra Coronavirus : गुरुवारी राज्यात 1877 नव्या रुग्णांची नोंद, पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Cases Today : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. मंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
Maharashtra Coronavirus Cases Today : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. मंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी एक हजार 877 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, बुधवारी राज्यात 1847 नवे रुग्ण आढळले होते तर मंगळवारी राज्यात 1782 नव्या रुग्णांची भर पडली होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 1971 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 79,06,291 करोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 1877 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज पाच कोरोना करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे.
सक्रीय रुग्ण कुठे किती? -
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 11 हजार 790 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई, ठाणे आणि पुणे, नागपूरमध्ये आहेत. मुंबईमध्ये 3818 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 1219 सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यात 2417 सक्रीय रुग्ण आहेत.
देशातही कोरोनचा आलेख चढता
गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 16,299 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 19,431 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 1,25,076 सक्रिय रुग्ण आहेत. तर देशाचा पॉझिटिव्हीटी दर 4.58 टक्के इतका आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतात आतापर्यंत 5,26,879 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या आजारातून आतापर्यंत एकूण 4,35,55,041 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड लसीचे एकूण 2,072,946,593 डोस देण्यात आले आहेत.