(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : दिलासा...! राज्यात शुक्रवारी 53,249 रुग्ण बरे होऊन घरी तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान
Maharashtra Corona Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4707980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.68% एवढे झाले आहे.
राज्यात आज 695 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 30602140 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5309215 (१७.३5 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3482425 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 28312 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 519254 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट झाली आहे. मुंबईत आज 1657 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2572 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 37 हजार 656 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 1,946 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर 2,037 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 199 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले आहे.
पुण्यात 18 एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम
पुणे शहरात आज नव्याने 1 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात शहरातील 3 हजार 318 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 24 हजार 990 झाली आहे. 18 एप्रिलपासून नव्या रुग्णसंख्येत होणारी घट कायम आहे.
राज्यात उद्या आणि परवा लसीकरण नाही
राज्यात उद्या आणि परवा लसीकरण होणार नाही. कोविन अॅप अपडेशनसाठी बंद राहणार असल्याने लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील बदललेल्या अंतराचं नियोजन करण्यासाठी कोविन ॲप बंद राहणार आहे. त्यामुळं 15 आणि 16 मे रोजी लसीकरण प्रक्रिया बंद असणार आहे.
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पहिला डोस घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यांचे अंतर ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंघाने पुढील दोन दिवसात कोविन अॅपवर काही बदल केले जाणार आहेत. त्यामुळं 15 आणि 16 मे रोजी लसीकरण सत्राचे कुठेही आयोजन करण्यात येणार नाही, अशी माहिती आहे. कोविन पोर्टलवरील बदल पूर्ण होताच लसीकरणाबाबत पुढील सूचना देण्यात येतील असं देखील सांगण्यात आलं आहे.