Maharashtra Coronavirus Case: राज्यात गुरुवारी 34,370 डिस्चार्ज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट 93.02 टक्क्यांवर
Maharashtra Coronavirus Case:राज्यात आज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 3,01,041 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Maharashtra Coronavirus Case: राज्यात आज तर 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 3,01,041 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 52,76,203 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 425 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,40,86,110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,72,180 (16.64 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22,18,278 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,996 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
सरकारी आकडेवारीनुसार राज्यात मागील 24 तासात चंद्रपूर शहर, गोंदिया जिल्हा,अमरावती शहर, अकोला शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली, जालना, औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, जळगाव शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, मालेगाव शहर, वसई विरार शहर, पालघर जिल्हा, मीरा भायंदर शहर, भिवंडी शहर या ठिकाणी कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद नाही.
मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान
मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,57,301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर गेला आहे. मुंबईत सध्या 28,310 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल 1,362 रुग्णांचे निदान झाले होते तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.
पुणे शहरात दिवसभरात नवे 588 कोरोनाबाधित!
पुणे शहरात आज नव्याने 588 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 68 हजार 129 इतकी झाली आहे. शहरातील 921 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51 हजार 991 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 193 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24 लाख 68 हजार 709 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 7 हजार 990 रुग्णांपैकी 996 रुग्ण गंभीर तर 1862 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 33 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 148 इतकी झाली आहे.