(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : रविवारी 144 नव्या करोना रुग्णांची भर, राज्यात 916 सक्रीय रुग्ण
Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे.
Maharashtra Corona Update : मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. रविवारी राज्यात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 194 नव्या कोरोना (Corona Update) रूग्णांची नोंद झाली होती. राज्यात काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासांत 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,28,091 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11% एवढे झाले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यात सध्या 916 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये सध्या 521 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 205 सक्रीय रुग्ण आहेत. रायगड 20, ठाणे 80, नाशिक 10, अहमदनगर 18, धुळे 24 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 च्या आतमध्ये आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी 144 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबई आणि उपनगरात 73 नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई सर्कलमध्ये एकूण 90 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नाशिक सर्कलमध्ये 13, पुणे सर्कलमध्ये 31, कोल्हापूर सर्कलमध्ये तीन, औरंगाबाद सर्कलमध्ये दोन, लातूर सर्कलमध्ये दोन, अकोला सर्कलमध्ये एक आणि नागपूर सर्कलमध्ये दोन नवीन करोना रुग्ण आढळले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवे कोरोनाबाधित -
देशातील कोरोना संसर्गाचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 2,593 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 1755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल भारतात कोरोनाचे 2,527 नवे रुग्ण आणि 33 रुग्णांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.