(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 1886 रुग्णांची नोंद तर 2106 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Corona Update : राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 1886 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2106 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.
पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,89,478 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 12583 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 12583 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3665 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 1955 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 24 तासात 13 हजार 734 नवीन रुग्णांची नोंद (Coronavirus Cases Today in India )
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. इतकच नाही तर नवीन रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात सोमवारी दिवस 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित आढळले असून गेल्या 24 तासांत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात देशात 13 हजार 734 नवीन कोरोनाबाधित आढळले असून तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा घटता आलेख ही एक दिलासादायक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 17 हजार 897 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 33 लाख 83 हजार 787 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 39 हजार 792 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.32 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.49 टक्के आहे.