Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 1849 कोरोना रूग्णांची नोंद, तीन बाधितांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : रविवारी महाराष्ट्रात 1849 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1853 रुग्ण बरे होऊन आज घरी परतले आहेत.
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 1849 कोरोना (Corona) रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1853 रुग्ण बरे होऊन आज घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांची संख्या 78,86,348 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98 टक्के झाले आहे. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रात 2087 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
तीन बाधितांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84 टक्के एवढा आहे.
चार आणि पाच व्हेरीयंटचे 62 रुग्ण
महाराष्ट्रात आज बी ए. चार आणि पाच व्हेरीयंटचे 62 रुग्ण आढळून आले. तर बीए.2.75 चे 79 रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील स्थिती काय आहे?
देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचं आढळून आलं आहे. देशात 19 हजार 673 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 336 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी ही संख्या दीड लाखांपर्यंत पोहोचली होती. सध्या देशात 1 लाख 43 हजार 676 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात एकूण 5 लाख 36 हजार 357 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत. शनिवारी 19 हजार 336 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून 4 कोटी 33 लाख 49 हजार 778 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.