Maharashtra Corona Update : राज्यात आज 999 नव्या रुग्णांची भर तर 49 रुग्णांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.64 टक्के इतकं झालं आहे तर मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार कायम असून शनिवारी दिवसभरात 999 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर एक हजार 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या 24 तासांत राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या हजारांच्या आत आलेली दिसत होती. ती पुन्हा एकदा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचं दिसतंय.
राज्यात आजपर्यंत एकूण 64,66,913 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.64 टक्के एवढे झाले आहे. .सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,38,63,284 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,23,344 (10.37 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,19,432 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशातील स्थिती
काही राज्यातील रुग्णसंख्या सातत्यानं वाढत असल्यामुळे देशाच्या दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 11 हजार 271 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच कालावधीत 11,376 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या एक लाख 35 हजार 918 इतकी झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 111 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांत देशात 57 लाख 43 हजार 840 जणांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत 112 कोटी 1 लाख 3 हजार 225 लसीचे डोस देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :