Maharashtra Corona Update : राज्यात आज 832 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 841 रुग्ण कोरोनामुक्त
Maharashtra Coronavirus Updates : राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत अल्पसा चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 832 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के आहे.
राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8,193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 85 हजार 874 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1043 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,53,57,358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,34,444 (10.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत 217 रुग्णांची नोंद तर चार जणांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात 217 रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात एकूण 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढून 2658 इतका झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईचा साप्ताहिक कोरोना वृद्धी दर 0.02 'टक्क्यांवर आला आहे. त्या आधी तो 0.03 टक्के इतका होता. गणेशोत्सवानंतरच्या काळात तो 0.06 टक्क्यांवर पोहोचला होता.
देशातील स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 774 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 481 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 621 जणांचा मृत्यू झालाय. दोन दिवसांच्या दैनंदिन आकडेवारी पाहिल्यास मृताच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतेय. शनिवारी देशात 465 जणांचा मृत्यू झाला होता.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एक लाख पाच हजार 691 इतकी झाली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळतोय. शनिवारी देशात 8 हजार 318 नवे रुग्ण आणि 465 जणांच्या मृत्यू नोंद करण्यात आली होती. तर 10 हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.
देशात आतापर्यंत 121.94 कोटी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98.34 टक्क्यांवर पोहचला. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे. देशात आतापर्यंत 3,39,98,278 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
संबंधित बातम्या :