Maharashtra Corona Update : राज्यातील रुग्णसंख्या ओसरली, 661 नव्या रुग्णांची नोंद तर केवळ 10 मृत्यू
Maharashtra Corona Update : गेल्या 24 तासात राज्यातील 896 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यासाठी एक दिलासादायक बातमी असून कोरोनाच्या रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 661 रुग्णांची नोंद झाली आहेत तर केवळ 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी ही गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी आहे.
गेल्या 24 तासात राज्यामध्ये एकूण 896 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 14 हजार 714 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.6 टक्के इतके झाले आहे.
सध्या राज्यात 1,48,880 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 968 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,31, 75, 053 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
देशातल्या रुग्णसंख्येत घट
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या आकडेवारीत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 10 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याच वेळी, शुक्रवारी 392 जणांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोनामुळे आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 60 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरणाचा आकडा 107 कोटींच्या पार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनाच्या 20 लाख 15 हजार 942 लसीचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर देशात आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 11 हजार रुग्णांची नोंद; 392 मृत्यू
- Coronavirus : फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे पाच लाख मृत्यूची भिती, WHO ने व्यक्त केली चिंता
- कोरोनावरील उपचारासाठी आणखी एक 'अस्त्र'; 'या' देशाने दिली गोळीला मंजुरी