(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात रविवारी 286 कोरोना रूग्णांची नोंद, एक बाधिताचा मृत्यू
Coronavirus Updates : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 1505 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहे.
Maharashtra Corona Update : राज्यात आज कोरोना (Covid-19) संसर्गाच्या 286 नवीन रूग्णांची (Maharashtra Corona Update) नोंद झाली आहे. तर, 313 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रूग्णांच्या निधनाबाबत जाणून घ्यायचे झाल्यास राज्यात आज एक कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येबाबत जरी दिलासादायक माहिती असली तरी मात्र एक्सबीबी व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यात आतापर्यंत एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 79,81,854 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले असून त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.16 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ही 1,48,386 इतकी झाली आहे.
सक्रिय रूग्ण (Maharashtra Corona Update) :
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 1505 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहे. यामध्ये मुंबईत सर्वात जास्त म्हणजे 527 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात 301 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर पुण्यात 296 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सक्रिय रूग्णांच्या संख्येत घट होत आहे.
देशातील स्थिती (India Corona Update) :
देशात एक हजार 604 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (India Corona Update) झाली आहे. देशात काल 1574 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर, गेल्या 24 तासांत देशात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून काल ही संख्या 19 इतकी होती. त्यामुळे देशातीलक कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असली, तरी कोरोना विषाणूमुळे होणारं मृत्यूचं प्रमाण घटलं आहे.
महाराष्ट्रात XBB व्हेरियंटच्या 36 रुग्णांची नोंद (XBB Varient) :
महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 319 नव्या रुग्णांची नोंद (Maharashtra Corona Update) झाली असून 406 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या नवीन एक्सबीबी व्हेरियंटचे (Covid-19 XBB sub-variant) एकूण 36 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत.
महत्वाच्या बातम्या :