(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Coronavirus : राज्यात मंगळवारी 266 नव्या रुग्णांची भर तर 241 कोरोनामुक्त
Maharashtra Coronavirus : राज्यात आज 266 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 241 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबई : राज्यातील कोरोनाच्या (Coronvirus) रुग्णसंख्येत काहीसा चढ-उतार दिसून येत आहे. राज्यात आज 266 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 241 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यात शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज शून्य कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज शून्य कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,829 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज 1551 सक्रिय रुग्ण
राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1551 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 932 सक्रिय रुग्ण हे मुंबईत असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 299 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,93,724 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट
देशातील (Coronavirus) कोरोना विषाणूच्या संसर्गात मोठी घट झाली आहे. देशात नवीन कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 569 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 2 हजार 467 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनावर मात केलेल्या नव्या रुग्णांमुळे आता देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 16 हजार 400 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 84 हजार 710 रुग्णांन कोरोनावर मात केली आहे. देशव्यापी लसीकरणात (Corona Vaccination) आतापर्यंत 191 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीनं आतापर्यंत भारतात 5 लाख 24 हजार 260 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 16 हजार 400 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने ही माहिती दिली आहे.