(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech LIVE: मुख्यमंत्री ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, राज्यात लॉकडाऊन?
Maharashtra CM address today : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LIVE
Background
Maharashtra CM address today : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन
राज्यात लॉकडाऊन करण्यावरून मतभेद पहायला मिळत असून अनेकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे नसून, राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह 'मिनी लॉकडाऊन' चा विचार सध्या सुरू आहे.
असा असू शकतो मिनी लॉकडाऊन
- सध्या राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीची वेळ वाढवून संध्याकाळी 7 ते सकाळी 8 पर्यंत करण्याचा विचार आहे. या वेळेतच दुकाने, हॉटेल, बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
- एकाच परिसरातील / विभागातील दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा विचार. एका गल्लीत एका रांगेतील सर्व दुकाने एका दिवशी सुरू राहतील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रांगेतील सुरू असतील.
- सर्वात जास्त फूट फॉल म्हणजेच गर्दीची ठिकाणे जसे मॉल, थिएटर्स, धार्मिक स्थळे, प्ले ग्राऊंडस, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता आहे. संकर्मनाचे केंद्र असलेल्या या ठिकाणांवर प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech सरकार खंबीर आहे
महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech पहिल्या दिवशीपासूनचे नियम आजही कायम
पहिल्या दिवसाचीच परिस्थिती कायम आहे, पण आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार. - मुख्यमंत्री
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech राज्यातील जनतेवर माझा विश्वास
राज्यातील जनतेवर माझा विश्वास आहे, तुम्हीय या युद्धातचे सैनिक आहात. अनावश्यक कारणामुळे बाहेर पडू नका. जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलात तर चित्र वेगळं असेल. पण, सद्यस्थिती कायम राहिली तर 15, 20 दिवसांत रुग्णालयं तुडूंब भरतील. स्वयंशिस्तीनेच कोरोनाला हरवणं शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech परिस्थिती हाताबाहेर गेली तर....
परिस्थिती हाताबाहेर गेली तर, ब्राझीलसारखं चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. रोजगार परत मिळेल. पण, गेलेला जीव परत मिळणार नाही. मला वेगळा उपाय हवा. लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य असलं तरी संसर्गाची साखळी तोडायची कशी, मुख्यमंत्र्यांचा सवाल
Maharashtra CM Uddhav Thackeray Speech येत्या काही दिवसांत कडक निर्बंध
येत्या एक-दोन दिवसांच कडक निर्बंध लागू करणार. कार्यालयांनाही सुचनावली दिलीच आहे.- मुख्यमंत्री