Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आलेख घसरला, रविवारी 1639 कोरोनाबाधितांची नोंद
Corona Update : राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला.
मुंबई : राज्यात आज 1639 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1698 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death)
राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,36, 576 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात एकूण 11679 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases)
राज्यात एकूण 11679 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4969 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2513 सक्रिय रुग्ण आहेत.
देशात 9436 नवे रुग्ण
देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी 24 तासांत दहा हजारांहून कमी कोरोनाबाधित आढळले आहेत. देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्याच्या तुलनेनं शनिवारी 84 रुग्णांची घट झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 86 हजार 591 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशात शनिवारी दिवसभरात 26 लाख 53 हजार 964 कोविड लसी देण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. साप्ताहिक कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा 2.70 टक्के आहे. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 2.93 टक्के आहे.