मुंबई : महाराष्ट्रात आज 42,320 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात आज एकूण 3,24,580 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत एकूण 51,82,592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.51 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 361 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,32,77,290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,02,19 (16.83 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27,29,301 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 24,932 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबई, पुण्यातील कोरोनाची आकडेवारी
मुंबईत मागील 24 तासात 1,057 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1312 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 334 दिवसांवर गेला आहे. तर पुण्यात अवघ्या 494 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यात आज 1410 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 48 हजार 258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर नंदूरबार जिल्ह्यात सर्वात कमी 1032 अॅक्टिव रुग्ण आहेत.
जिल्हानिहाय कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण
- मुंबई - 28,299
- ठाणे - 24,337
- पालघर - 8,585
- रायगड - 5,676
- रत्नागिरी - 4,907
- सिंधुदुर्ग - 4,640
- पुणे - 48,258
- सातारा - 18,801
- सांगली - 16,136
- कोल्हापूर-4,713
- सोलापूर - 16,511
- नाशिक - 13,714
- अहमदनगर - 14,624
- जळगाव- 7,390
- नंदुरबार- 1,032
- धुळे - 2,776
- औरंगाबाद - 6,723
- जालना - 5,430
- बीड - 9,324
- लातूर - 4,262
- परभणी - 4,702
- हिंगोली - 2,022
- नांदेड - 3,593
- उस्मानाबाद -4,617
- अमरावती - 8,204
- अकोला - 6,002
- वाशिम-3,128
- बुलढाणा - 3,277
- यवतमाळ - 4,526
- नागपूर - 16,562
- वर्धा - 4,280
- भंडारा - 1,656
- गोंदिया - 1,493
- चंद्रपूर - 5,733
- गडचिरोली - 1,621
इतर महत्त्वाच्या बातम्या
- मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला
- Covid 19 Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका नाही, एम्सच्या संचालकांचा दावा
- मोठा दिलासा...! आज राज्यातील एकूण 16 शहर आणि जिल्ह्यात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही
- कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटो; सरकार म्हणतं, 'ज्यांचे पैसे, त्यांचाच फोटो'