रायपूर : कोरोना काळात या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या संकटाच्या काळातही नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवलेलं नाही. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का? असा प्रश्न अनेकदा अनेकांचा उपस्थित केला आहे. मात्र छत्तीसगड सरकारकडून कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरचा पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा फोटो हटवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या जागी आता छत्तीसगड सरकारने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावरुन छत्तीसगडमध्ये वादंग उठलं आहे. 


छत्तीसगडमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो लावण्यास सुरुवात केली आहे. यावरुन विरोधीपक्ष भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी काँग्रेस कोरोना लसीकरणाऐवजी फोटो प्रचारावर जास्त लक्ष देत असल्याची टीका भाजपने केली. भाजपच्या टीकेनंतर छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी भूपेश बघेल यांचा फोटो लावण्यामागचं कारणही सांगितलं आहे. 


छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी म्हटलं की, राज्य सरकार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च करत आहे. त्यामुळे लसीकरणानंतर नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्ममंत्री भूपेश बघेल यांचा फोटो असलेलं प्रमाणपत्र दिलं जात आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण राज्य सरकार करत आहे मग लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो का लावू नये? असा सवालही आरोग्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 


इतर संबधित बातम्या