एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेस नेते उद्या सोनिया गांधींची भेट घेणार, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत भूमिका मांडणार
विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवर यांच्या मते, 90 टक्के काँग्रेसच्या आमदारांचं असं म्हणण आहे की, भाजपला आता थांबवलचं पाहिजे आणि म्हणून शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. हीच भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते उद्या दिल्लीत हायकंमांडची भेट घेणार आहे.
मुंबई : एकीकडे काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगत असतानाच उद्या काँग्रेस नेते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. उद्या संध्याकाळी काँग्रेसचे नेते दिल्लीला जाणार आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचे 90 टक्के आमदार शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या बाजूनं आहेत, अशी माहिती मिळते आहे.
काँग्रेसल मधला एक गट असा आहे की जो शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार आहे. तर विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवर यांच्या मते, 90 टक्के काँग्रेसच्या आमदारांचं असं म्हणण आहे की, भाजपला आता थांबवलचं पाहिजे आणि म्हणून शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे. हीच भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे नेते उद्या दिल्लीत हायकंमांडची भेट घेणार आहे. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी हायकंमांडकडे आग्रहाची भूमिका मांडणार आहेत. थोड्याचं दिवसांपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट झाली हेती. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींची यांच्या भेटीत सत्तास्थापनेबाबत काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान राज्यात बिगर भाजप सरकार येणं ही काँग्रेसजनांची इच्छा असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बुधवारी केलं. तसेच यासंदर्भात शिवसेनेने भूमिका घ्यावी असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे.
जनतेने कौल काही भाजपच्या बाजूने दिलेला नाही, त्यामुळे भाजपचं सरकार राज्यात येता कामा नये हा प्रमुख निष्कर्ष आहे. यासाठीचे सर्व पर्याय आम्ही चर्चा करुनचं निर्णय घेऊ असंही चव्हाण म्हणाले. पण प्रथम निर्णय शिवसेना काय घेते हा महत्त्वाचा विषय आहे. शेवटी शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतरचं राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल. त्यामुळे बिगर भाजप सरकार येणं हे आमचं प्राधान्य राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले.
Ashok Chavan | बिगर भाजप सरकार बनणं ही काँग्रेसजनांची इच्छा : अशोक चव्हाण | ABP Majha
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट
शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संजय निरुपम यांच्यासह काही ज्येष्ट नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली आहेत. तर हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम यांच्यासह पक्षातील तरुण नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement