Devendra Fadnavis Deputy CM : शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी होणार, उपमुख्यमंत्री पदाची घेणार शपथ
Devendra Fadnavis Deputy CM : देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू होती. केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर अमित शाह यांना यश मिळाले.
Devendra Fadnavis Deputy CM : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नव्या सरकारमध्ये सहभागी होणार आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहे.अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात फडणवीस शपथ घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू होती. केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर अमित शाह यांना यश मिळाले. अमित शाह आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रासाठी निष्ठा आहे. मी देवेंद्र फडणवीसांना मनाापासून शुभेच्छा दिल्या आहे.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनदा फोन केला. नरेंद्र मोदींच्या आग्रहानंतर फडणवीसांना शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला.
काय म्हणाले नड्डा?
जेपी नड्डा यांनी बोलताना सर्वात आधी नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील सरकारचे अभिनंदन केलं. तसंच यावेळी भाजप सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी लढतो असं म्हणत महाराष्ट्रातील जनतेचं भलं करणं हाच आमचा उद्देश असल्याचंही ते म्हटले. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप पूर्णपणे उभी असणार आहे, पण या भाजपच्या केंद्रीय टीमने देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, असं ठरवलं असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य नड्डा यांनी यावेळी केलं.