Eknath Shinde Party Symbol : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना; ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रया
eknath shinde party symbol : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सर्वसामान्यांची शिवसेना असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सूर्य या चिन्हाला आम्ही पहिली पसंती दिली होती. परंतु, निवडणूक आयोगाने आम्हाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलं. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेलं ढाल-तलवार हे चिन्ह मराठमोळी निशाणी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
ढाल-तलवार ही मराठमोळी निशाणी आधीच प्रत्येकाच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे आम्हाला आता हे चिन्ह नव्याने पोहचवण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 'सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार' असं ट्विट केलंय. "आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार.... सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार .... बाळासाहेबांची निशाणी, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय.
आम्हीच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार....
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 11, 2022
सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी #ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू #तलवार....#बाळासाहेबांची_शिवसेना
निशाणी : #ढाल_तलवार pic.twitter.com/QsatzmPdCE
शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिलाय. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. त्यातून ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलंय.
निडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावं दिली. यात ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाने आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे.
शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि त्यामध्ये ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटाने पहिल्या पसंतीस दिले होते. परंतु, निवडणूक आयोगाने हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण उगवता सूर्य हे डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. याबरोबरच झोराम नॅशनल पक्षाचं देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे.
महत्वाच्या बातम्या