एक्स्प्लोर
ईडी स्वतंत्रपणे काम करते, आमचा काही संबंध नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चूक नसल्यास राज ठाकरेंना घाबरण्याची गरज काय? आरोपांमध्ये तथ्य नसल्यास राज ठाकरेंना सोडलही जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीबाबत मीच अनभिज्ञ आहे. तसेच चूक नसल्यास त्यांनी घाबरण्याची काय गरज? अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण या नोटीशीबाबत अनभिज्ञ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'राज यांना नोटीस आली असेल तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे, चूक नसल्यास त्यांना घाबरण्याची गरज काय?', असं फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच ईडीचा आमचा संबंध नाही. ती यंत्रणा स्वतंत्रपणे काम करते, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे नेत्यांसह विरोधकांनी सरकारवर ईडीचा वापर करुन विरोधकांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे बंदचं आवाहन केलं आहे. येत्या 22 ऑगस्टला ठाण्यातील मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. या दिवशी गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
राज ठाकरेंना नोटीस म्हणजे सूडाचं राजकारण : राजू शेट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement