(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दांडीबहाद्दर' मंत्री! मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहण्यात चढाओढ, एकाही मंत्र्याची 100 टक्के उपस्थिती नाही
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांनी आतापर्यंत बोलावलेल्या 94 मंत्रिमंडळ बैठकांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या एकाही मंत्र्याने 100 टक्के हजेरी लावलेली नाही.
Maharashtra Cabinet Meeting : मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग करायची, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की, मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे हे वास्तव समोर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांनी आतापर्यंत बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या एकाही मंत्र्याने 100 टक्के हजेरी लावलेली नाही. या 'दांडीबहाद्दर' मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे शंकरराव गडाख हे आघाडीवर आहेत. त्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे, उदय सामंत, सुनील केदार, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, हसन मुश्रीफ, डॉ. नितीन राऊत, विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये चढाओढ आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत हजर असलेल्या नेत्यांची माहिती मागवली होती. त्यामध्ये 'दांडीबहाद्दर' नेत्यांची माहिती समोर आली आहे. मुख्य सचिव कार्यालयाने अनिल गलगली यांना मंत्रिमंडळाच्या 94 बैठकीचा उपस्थित तक्ता दिला आहे. यामध्ये आधीच्या 8 बैठकीत फक्त उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ नितीन राऊत, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे 7 जणच मंत्रिमंडळात होते. त्यानंतर 86 बैठका झाल्या आहेत. 28 नोव्हेंबर 2019 पासून 23 डिसेंबर 2021 राज्य मंत्रिमंडळाच्या 94 बैठका पार पडल्या आहेत. या मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये अनेक मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या 94 बैठकाला एकाही मंत्र्याने 100 टक्के उपस्थिती दर्शवली नाही. सर्वाधिक गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख राहिले आहेत. तर राष्ट्रवादीचे मंत्री राजेंद्र शिंगणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Pune : देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर भिरकावली चप्पल, राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
TET Exam Scam : शिक्षक परीक्षा घोटाळा 240 कोटींचा, प्रत्येकाकडून घेतले चार लाख रुपये
Mumbai Indians Schedule: मुंबई इंडियन्स आयपीएल 2022 साठी सज्ज, दिल्लीविरुद्ध सामन्याने करणार शुभारंभ, पाहा MI चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live