राज्यात गुजरात पॅटर्नने मंत्रिमंडळ विस्तार होणार का? दिग्गजांना डच्चू मिळणार का?
Maharashtra Cabinet Expansion : सरकार स्थापन होऊन 35 दिवस झाले. पण मंत्रिमंडळ काही तयार होईना. आणि आता नव्याने दोन फॉर्म्युले मात्र समोर आले आहेत.
Maharashtra Cabinet Expansion : सरकार स्थापन होऊन 35 दिवस झाले. पण मंत्रिमंडळ काही तयार होईना. आणि आता नव्याने दोन फॉर्म्युले मात्र समोर आले आहेत. त्यातला पहिला आहे. महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न आणि पुन्हा एकदा युती पॅटर्न. पाहूयात हे दोन पॅटर्न आहेत तरी काय?
गुजरात पॅटर्न आहे तरी काय?
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात जुन्या मंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना स्थान देण्यात येऊ शकते. यामध्ये 60 टक्के नवीन चहरे तर 40 टक्के जुने चेहरे असणार... जातीय आणि प्रादेशिक समीकरण लक्षात घेत कॅबिनेटमध्ये वर्णी लागू शकते. काही कॅबिनेट मंत्र्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊ शकतात.
गुजरातमध्ये 2021 मध्ये भूपेश पटेल यांच्या मंत्रिमंडळातून सर्वच्या सर्व जुन्या मंत्र्यांना नारळ देत... नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती... महाराष्ट्रात जरी 100 टक्के बदल होणार नसला... तरी 60 टक्के जुन्या मंत्र्यांना टाटा करण्याच्या मूडमध्ये शिंदे सरकार आहे. याचा अर्थ किमान 25 ते 28 नवे मंत्री या मंत्रिमंडळात दिसू शकतात... आणि 12 ते 15च जुन्या मंत्र्यांना संधी मिळेल. आणि त्यामुळेच जुन्या जाणत्यांना वगळू नका. असा तगादा लावत देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत...
युती पॅटर्न काय आहे?
आता दुसरा फॉर्म्युला जाणून घेऊयात. हा आहे... पूर्वापार चालत आलेला. युती पॅटर्न, म्हणजे या पॅटर्नमध्ये फक्त किरकोळ बदल असतील.जुन्या जाणत्या मंत्र्यांना पुन्हा संधी देणे. फार नव्या चेहऱ्यांना संधी नाही. प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न करणे. आता या पॅटर्नवर विश्वास ठेवायचा. तर या पॅटर्नमधून काही संभाव्य नावेही चर्चेत आली आहेत.
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
प्रवीण दरेकर
राधाकृष्ण विखे पाटील
रविंद्र चव्हाण
बबनराव लोणीकर
नितेश राणे
आणि अपक्षांकडून रवी राणा
तर
शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळू शकते?
दादा भुसे
उदय सामंत
दीपक केसरकर
शंभूराज देसाई
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
अब्दुल सत्तार
गुलाबराव पाटील
आणि अपक्षांकडून बच्चू कडू
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.