एक्स्प्लोर
Advertisement
दोन दिवसांत खातेवाटप करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
दोन दिवसांत खातेवाटप करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा. तर महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरु झाल्याची माहिती
मुंबई : बहुमत चाचणी, विधानसभाध्यक्ष निवडणूक, विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती यासह इतर कामासाठी बोलवण्यात आलेलं विधिमंडळाचं अधिवेशन काल संपलं आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत मंत्रिमंडळाचं खातेवाटप करु अशी घोषणा खुद्द नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाचा मुहूर्त जाहीर केला.
सरकारचे जाहीर झालेले सात मंत्री एकत्रीतपणे काम करतो आहे. सगळी खाती आम्ही सात लोकं व्यवस्थितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होईल अस काही होतं नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. नुकतचं पहिलं अधिवेशन पार पडलं आहे. मंत्रिंमंडळाने कामकाज करायला सुरुवात केलीय. एकूणचं राज्यातील परिस्थितीची महिती घ्यायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळाची प्राथमिक बैठक रविवारी झाली असून राज्याच्या परिस्थितीचं सगळ चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु होईल.
Aarey | ठाकरे सरकारकडून आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश | एबीपी माझा
आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करत अनेक पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मेट्रो कारशेडसाठी आरेतील 2646 झाडे तोडण्यावरुन शिवसेना-भाजपमध्ये चांगली जुंपली होती. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. राज्यात सरकार आल्यास आरेला जंगल घोषीत करण्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावेळी मेट्रोचे काम सुरु असून फक्त कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आगामी एक-दोन दिवसात खाते वाटप करणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
CM Uddhav Thackeray | राज्यातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार - मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement